पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेश

अकोला ः कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या संचारबंदी कालावधीत पतसंस्थांचे कामकाज सुरु राहिल, असे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या संचारबंदी कालावधीत पतसंस्थांचे कामकाज सुरु राहिल, असे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात पतसंस्था सुरु ठेवाव्या की नाहीत याबाबत जारी निर्देशाबाबत संस्थाचालकांकडून विचारणा होत होती. मात्र लॉकडाऊनमधून वित्तीय संस्थांना वगळले असल्याने व पतसंस्थाही वित्तीय संस्था असल्याने त्या सुरु ठेवाव्यात. ग्रामीण भागात सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून पतसंस्था सुरु राहणे गरजेचे आहे.

तथापि पतसंस्थांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावयाचे आहे. तसेच संस्थेत कमीत कमी कर्मचारी उपस्थित ठेवावयाचे आहेत. कामकाज करताना साबणाने हात धुणे, संस्थेत लोकांच्या प्रवेशावेळी सॅनिटायझरचा वापर, गर्दी होऊ न देणे याबाबत खबरदारी घ्यावी असे निर्देशही देण्याच आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com