चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले

चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य सरकारने घेत खरिपासाठी पीककर्ज वितरणाचे निर्देश दिले. मात्र जिल्ह्यातील पंधरा हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडल्याने हे शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य सरकारने घेत खरिपासाठी पीककर्ज वितरणाचे निर्देश दिले. मात्र जिल्ह्यातील पंधरा हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडल्याने हे शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता राज्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्‍ती योजना राबविण्यात आली. या योजनेत आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्‍तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक, बॅंक खाते, थकीत कर्जाची रक्‍कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तर मान्य हा पर्याय निवडून शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया करावी लागते. 

पीक कर्जासाठी हे प्रमाणिकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले. जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत केवळ २७३.८२ लाखांचे कर्ज वाटप झाले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बॅंक खात्याची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरुवातीला कर्जमुक्‍तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती. टप्याटप्प्याने कर्जमुक्‍त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याही प्रकाशित केल्या. मात्र मार्चच्या अखेरीस ‘कोरोना’चा प्रादुर्भाव सुरु होताच लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे प्रमाणीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com