Farmer Agricultural News agitation on cotton onion issues Nagar Maharashtra | Agrowon

नगर  : शेतकरी संघटनेने मुठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नगर  : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापूस जाळून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आपल्या राहत्या घरी हे आंदोलन केले.

नगर  : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापूस जाळून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आपल्या राहत्या घरी हे आंदोलन केले.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी ती अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. तसेच फक्त एफएक्यू कापसाची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसासंबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी मुठभर कापूस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी हटवली आहे. तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेडमार्फत २००० रुपये प्रतीक्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापूस जाळण्याचे आंदोलन केले. लॉकडाउनचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले.
मधुसुदन हरणे, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर, शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, महिला आघाडी अध्यक्षा गीता खांडेभराड, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे आदी नेत्यांनी आपापल्या भागात हे आंदोलन केले, असे श्री. घनवट यांनी सांगितले.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...