Farmer Agricultural News agitation for electricity bill issue Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ः राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. लॉकडाउनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे भरमसाठ वीज बिले भरायची कशी, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीयांच्यावतीने आज (ता.१३) घरगुती वीज बिलांची होळी केली जाणार आहे.

कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. लॉकडाउनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे भरमसाठ वीज बिले भरायची कशी, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीयांच्यावतीने आज (ता.१३) घरगुती वीज बिलांची होळी केली जाणार आहे. सरकारने याची दखल घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.  

शेट्टी म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीयांच्या वतीने तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ‘स्वाभिमानी’तर्फे हे आंदोलन केले जाणार आहे. लॉकडाउनमध्ये सर्वसामान्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशा स्थितीत महावितरणकडून तीन महिन्यांची दुप्पट, तिप्पट बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. लॉकडाउनमध्ये वीज दरवाढ केली आहे. वास्तविक या काळात सरकारने घरगुती वीज बिल माफ करुन ग्राहकांना दिलासा देण्याची गरज होती. दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. 


इतर बातम्या
पीक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाची कास...औरंगाबाद ः यंदा मराठवाड्यात पाऊस नियमित आणि भरपूर...
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...