Farmer Agricultural News agitation for electricity bill issue Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज बिलांची होळी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

अव्वाच्या सव्वा दराने वीज आकारणी झाल्याने सर्वसामान्यांना वीज बिले दुप्पट, तिप्पट आलेली आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.

सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात झालेल्या लॉकडाउनच्या काळात तीन महिन्यांत घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीज आकारणी झाल्याने सर्वसामान्यांना वीज बिले दुप्पट, तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.१३) महावितरणच्या मुख्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.

‘कोरोना’च्या काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आली आहेत. राज्यभरात वीजबिलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी व प्रा. एन.डी.पाटील यांनी वीज बिलांच्या विरोधात आंदोलनाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वात सोलापुरात वीजबिलांची होळी करण्यात आली. जुनी मिल कंपाऊंड परिसरातील महावितरणच्या प्रवेश द्वारासमोर घोषणाबाजी करीत वीज बिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला.

त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आज फक्त वीजबिले जाळली, जर वीज बिले माफ केली नाही तर महावितरणचे कार्यालयही जाळू, असा इशाराही यावेळी ‘स्वाभिमानी’ने दिला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महामुद पटेल, पप्पु पाटील, सचिन मस्के, मोहसीन बिराजदार, अश्विनी व्हटकर सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...