शेतकरीप्रश्नी `रयत क्रांती`चे पंढरपुरात आंदोलन

सोलापूर ः रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह दुधाला दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात मंगळवारी (ता.७) तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दूध आणि बेदाण्यांचा अभिषेक घालत लक्ष वेधले.
पंढरपूर येथे मंगळवारी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दूध आणि बेदाण्यांचा अभिषेक घालण्यात आला.

रयत संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. संघटनेचे आकाश डांगे, सोमनाथ भोसले, सूरज भोसले, सुनील पाटील, नंदू व्यवहारे आणि अण्णा मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला या कार्यकर्त्यांनी दूध आणि बेदाण्यांचा अभिषेक घातला. याबाबत श्री. भोसले म्हणाले, ‘‘आम्ही सातत्याने संपूर्ण कर्जमाफी मागतो आहोत. दूधदराचा विषय मांडतो आहोत; पण दखल घेतली जात नाही. शासनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने आम्ही आंदोलन करीत आहोत. पुढच्या टप्प्यात आणखी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू.’’   संघटनेच्या या आहेत मागण्या...

  • शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा.
  • गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये, म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळावा.
  • बेदाण्याला २५० रुपये प्रतिकिलो दर मिळावा.
  • शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे, सलग १२ तास वीजपुरवठा करावा.
  • कांद्याला प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे.
  • खासगी सावकार, बॅंका, फायनान्स यांच्या सक्तीच्या वसुलीवर बंदी घालावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com