संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा कोल्हापुरात मोर्चा

संपुर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कोल्हापुरात भाजपचा मोर्चा
संपुर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कोल्हापुरात भाजपचा मोर्चा

कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करत त्याविरोधात भाजपने मंगळवारी (ता. २८) येथे एल्गार मोर्चा काढला.  संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास  मंत्रालयासमोर आंदोलन करु असा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी दिला.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्सच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी माजीमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

विद्यमान सरकारने भाजप सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेतील निकष बदलत शेतकऱ्यांसाठी नवी कर्जमाफी योजना आणली. पण, या योजनेतून कोणताच शेतकरी समाधानी झाला नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी झाली आहे. सरकारने भाजप सरकारचे नियम मोडून नवे नियम केले आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली, हे येथून पुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे भाजप नेत्यांनी या वेळी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी वर्षअखेरीस कर्जाचा पूर्ण भरणा करतात. अशा हजारो प्रामाणिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीही लाभ होणार नाही. यामुळे गावोगावचे संतप्त शेतकरी विकास सेवा संस्थांना टाळे ठोकत आहेत. याची दखल घेऊन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच तातडीने संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी या वेळी भाजपच्यावतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. ‘...तर ठिणगी कोल्हापुरातून पडेल’ येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही तर त्याची ठिणगी कोल्हापुरातून पडेल. प्रसंगी आम्ही मंत्रालयासमोर जाऊन आंदोलन करू, असा इशाराही या वेळी उपस्थित भाजप नेत्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com