Farmer Agricultural News agitation of market committee workers for demands Nashik Maharashtra | Agrowon

नाशिक बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी धरणे आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा व सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (ता.१३) बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात केले आहे. शुक्रवारी (ता.१४) देखील हे आंदोलन सुरुच होते. बाजार समिती प्रशासन जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा भूमिका बाजार समितीच्या कर्मचारी संघटनेने घेतली आहे. 

नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा व सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (ता.१३) बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात केले आहे. शुक्रवारी (ता.१४) देखील हे आंदोलन सुरुच होते. बाजार समिती प्रशासन जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा भूमिका बाजार समितीच्या कर्मचारी संघटनेने घेतली आहे. 

महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष नीलेश दिंडे यांच्या नेतृत्वाखाली मोहन पाटील, सोमनाथ पिंगळे, रघुनाथ धोंडगे, विष्णू दिंडे, सुजाता ढेरिंगे, आशा वरपे यांच्यासह कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘शासनाने वेळोवळी बाजारसमिती कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ दिली असून, बाजार समित्यांनी आपल्या आर्थिक स्थितीनुसार त्याची अंमलबजावणी करावी,’’ असे आदेश दिले आहेत. नाशिक बाजार समितीची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. तसेच आस्थापना खर्चही मर्यादेतच असतानाही समिती महागाईभत्ता वाढ दिलेली नाही. सद्यःस्थितीत महागाई भत्ता १२५ टक्के प्रमाण अदा करण्यात येत आहे. शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला असतानाही बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेही वेतन दिले जात नाही. तसेच राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांनी सातवा वेतन आयोग लागू केलेला असताना नाशिक बाजार समिती याबाबत वेळकाढूपणा करीत आहे. 
 
ह्या आहेत प्रमुख मागण्या 

  • थकीत सहावा वेतन आयोग पूर्ण लागू करा.सातवा वेतन आयोग लागू करा.
  • दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद केलेल्या सुट्या पुन्हा सुरू व्हाव्यात.
  • पदानुसार कर्मचाऱ्यांना कामकाज द्यावे.
  • अन्यायकारक बदल्या रद्द कराव्यात. 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...