Farmer Agricultural News agitation of market committees against deregulation Nashik Maharashtra | Agrowon

नियमनमुक्ती विरोधात उद्या बाजार समित्यांचा लाक्षणिक संप

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

नाशिक ः केंद्राच्या नियमनमुक्तीच्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी उद्या (ता.२१) महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने राज्यातील बाजार समित्यांना एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले आहे. 

नाशिक  : केंद्र सरकारने राज्यांची सहमती न घेताच नियमनमुक्तीचा अध्यादेश काढून बाजार समित्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. केंद्राच्या या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी उद्या (ता.२१) महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने राज्यातील बाजार समित्यांना एक दिवसीय लाक्षणिक संप करण्याचे आवाहन केले आहे. 

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या कायद्याने स्थापित झालेल्या विपणन संस्था असून त्यावर शासनाचे नियंत्रण आहे. त्यामध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल व मापारी यांना प्रतिनिधित्व आहे. तसेच बाजार समित्यांच्या निर्णय प्रक्रियेत शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. असे असताना केंद्राने नियमनमुक्तीबाबत अध्यादेश काढले आहेत. राज्याच्या पणन संचालकांनीही यासंबंधी अंमलबजावणीचे आदेश बाजार समित्यांना दिले आहेत.

एकीकडे मार्केट फी व्यतिरिक्त बाजार समित्यांना कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा आर्थिक मदत शासनाकडून मिळत नाही. या फीमधून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा, देखरेख, वीज, पाणी, गोदामे, शेड, वजनकाटे, बाजार समितीतील कर्मचारी वेतन आदी खर्च भागवावा लागतो. 

मात्र, नियमनमुक्तीच्या अध्यादेशामुळे बाजार समित्यांना बाहेरील व्यवहारातून सेस मिळणार नाही. बाजार समित्यांचे उत्पन्न बंद झाल्यास सोयी सुविधा पुरवण्यासाठी बंधने येतील, बाजार समित्यांचा खर्च भागणार नाही, असे संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

‘शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या’ 
शासनाने या अध्यादेशाचा फेर विचार करावा व त्यास विरोध करण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी शुक्रवारी (ता.२१) पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत संप करावा. कायदा, सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, लाक्षणिक संपाबाबत फलकांवर लिहून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
उपस्थित करण्यात आलेले प्रश्न 

  • या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार काय. 
  • शेतकऱ्यांच्या शेतीमालाची हमी कोण घेणार, दर कोण ठरविणार. 
  • शेतीमाल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची रक्कम न मिळाल्यास कोणास जबाबदार ठरविणार.

प्रतिक्रिया
नियमनमुक्तीच्या अध्यादेशामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा पडून राहतील. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही फेडणे शक्य होणार नाही. भविष्यात बाजार समित्यांवर अवलंबून असणारे हमाल, मापारी, तोलणार, बाजार समिती कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.
— आमदार दिलीप मोहिते, सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ.


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...