Farmer Agricultural News agitation for milk issue Parbhani Maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन बंद आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१) जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको तसेच दूध संकलन बंद आंदोलन करण्यात आले.

परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१) जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको तसेच दूध संकलन बंद आंदोलन करण्यात आले.

‘कोरोना’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गायीच्या दुधाचा खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा, या मागण्यांसाठी जिंतूर येथे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्या चौधरी, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, सचिन गोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पंडित दराडे, गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, लक्ष्मण बुधवंत,अशोक बुधवंत, सुयोग मुंडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

परभणी येथील उड्डाण पुलावर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलनात सुरेश भुमरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथे दूध संकलन बंद करण्यात आले. बाबासाहेब जामगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक, उमेश देशमुख आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. परभणी आणि पूर्णा तालुक्यात ३ ठिकाणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड आदी तालुक्यांत मिळून १४ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सेलू, डिग्रस जहांगीर येथे एल्गार आंदोलन
अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे शनिवारी (ता.१) सेलू आणि डिग्रस जहांगीर येथे दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री महादेवाच्या पिंडींवर दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध करण्यात आला.

दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव तसेच प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात कॉ. रामेश्वर पौळ, उद्धव पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तुसिंग ठाकूर सांगतानी, विकास पौळ, शिवाजी पौळ,धोंडिबा पातळे, रत्नेश्वर पौळ, माणिक पौळ, शिवाजी शेरे, विष्णू शेरे पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...