Farmer Agricultural News agitation of milk producers for several demands Aurangabad Maharashtra | Agrowon

मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध उत्पादकांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा दूध दर उत्पादकांना मिळावा, या मागणीसाठी शनिवारी (ता.१) मराठवाड्यात दूध उत्पादकांनी आंदोलन केले. त्याचा थेट परिणाम  दूध संकलनावर झाला आहे.

औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा दूध दर उत्पादकांना मिळावा, या मागणीसाठी शनिवारी (ता.१) मराठवाड्यात दूध उत्पादकांनी आंदोलन केले. त्याचा थेट परिणाम  दूध संकलनावर झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या डोनगाव शिवारातील गोदावरी नदीकाठच्या मंदिरातील श्री गणपती मूर्तीला दुग्धभिषेक व त्याच मंदिराबाहेर राज्यातील सत्ताधारी पक्षाची नावे असलेल्या दगडाची प्रतीकात्मक देव म्हणून त्यांना दुग्धभिषेक घालून पूजा करत योग्य निर्णय घेण्याचे साकडे घालण्यात आले. यावेळी शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांच्यासह दूध उत्पादक यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, शुक्रवारी(ता. ३१) सायंकाळी लाखगंगा येथील सरपंच दिगंबर तुरकणे, राजेंद्र तुरकणे, सोपान पडवळ, नाना बाप्पू तुरकणे, केशव मोरे, त्र्यंबक तुरकणे यांच्यासह जवळपास शंभरावर दूध उत्पादकांनी लाखगंगा (ता. वैजापूर) येथील ग्रामदेवतेला दुग्धभिषेक करून जोरदार घोषणाबाजी करीत दूध दरप्रश्नी आपल्या एकजुटीचे दर्शन घडविले होते. यावेळी लाखगंगा येथील भजनी मंडळाच्या सदस्यांनी भजन गाऊन श्री हनुमंताला दूध उत्पादकांच्या मागण्यांविषयी सरकारला सबुद्धी देण्याचे साकडेही घातले होते.

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. १ ऑगस्टला राज्यभर गावोगावी चावडीवर दुधाचा अभिषेक करीत व निदर्शने करीत हे आंदोलन तीव्र केले जाणार होते. त्यानुसार मराठवाड्यात विविध ठिकाणी शनिवारी(ता.१) आंदोलने झाली.

दूध संकलनावर परिणाम
शासन निर्णय घेत नाही तोवर डेअरींना दूध घालायचे नाही, या दूध उत्पादकांच्या भूमिकेमुळे शनिवारी दूध संकलनावर मोठा परिणाम झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दूध संकलन ठप्प होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन खासगी प्रकल्प व परभणी जिल्ह्यातील दोन प्रकल्पांचे दूध संकलनही बंद होते. जवळपास दीड लाख लिटर दूध संकलन शनिवारी दुपारपर्यंत झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

भाजपचे एल्गार आंदोलन
औरंगाबाद येथील दूध डेअरी चौकात भाजपने आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात एल्गार आंदोलन केले गेले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,  भगुर फाटा (ता.वैजापूर) येथे रास्ता रोको, देवगाव (ता.पैठण), उजनी (ता.औसा) येथे लातूर - सोलापूर  महामार्गावर भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी रास्ता रोको, बोरदहेगाव फाटा येथे नागरिकांना दूध वाटप, बिडकीन येथे निदर्शने, चित्तेपिपंळगाव येथे दूध न स्वीकारता दूध बंद आंदोलन केले गेले. जालना जिल्ह्यातील अंबड येथेही एल्गार आंदोलन केले गेले.

प्रतिक्रिया
गायीच्या दुधाला असलेला ३० रुपयांचा दर सरकारने १५ रुपयांवर आणून ठेवला. आता जोपर्यंत शासन योग्य निर्णय घेत नाही, तोपर्यंत डेअरीला दूध घालणे बंद ठेवणार आहे.
- जालिंदर तुरकने, दूध उत्पादक, लाखगंगा, जि. औरंगाबाद.
 
सत्तेतील तिन्ही पक्षांना देव मानत दुधाचा अभिषेक करून सुबुद्धीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. सरकारने दूध उत्पादकांचा अंत पाहू नये.
- धनंजय धोर्डे, शेतकरी नेते, डोनगाव, जि. औरंगाबाद.
 
या आहेत प्रमुख मागण्या

  • दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा. राज्य सरकारने प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे. 
  • २६ जून रोजी केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशांतून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा.
  • जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. 
  • देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रतिकिलो किमान ५० रुपये अनुदान द्यावे.

इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...