किसान सभा करणार दुग्धाभिषेक घालत आंदोलन

नगर ः दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज (शनिवारी) राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात राज्यभरातील दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज (शनिवारी) राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात राज्यभरातील दूध उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केले आहे.  

किसान सभेचे नेते डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले यांनी सांगितले, की दूध दराबाबत विविध मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. यावेळी राज्यभर गावोगावी चावडीवर दुग्धाभिषेक घालत व निदर्शने करीत हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे. 

लॉकडाउनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. मात्र लॉकडाउनमुळे दूधाला मागणी घटल्याने गायीच्या दुधाचे भाव १७ रुपयांपर्यंत खाली कोसळले. शेतकऱ्यांना अशा संकटात मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने प्रतिदिन १० लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किमान २५ रुपये दराची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू करण्यात आली.

राज्यातील ७६ टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी दूध कंपन्यांना यातून वगळण्यात आले. परिणामी सरकार प्रतिदिन दहा लाख लिटर दूध खरेदी करू शकले नाही. शेतकऱ्यांना यामुळे पुरेसा दिलासा मिळाला नाही. योजना सुरू असतानाही दुधाचे खरेदी दर यामुळे १७ रुपयांपर्यंत खाली आले. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आता दूध विकत घेण्याऐवजी किंवा कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.    या आहेत प्रमुख मागण्या

  • दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये भाव मिळावा. 
  • राज्य सरकारने प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. 
  • केंद्र सरकारने १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा आणि जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. 
  • देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com