नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन

नगर ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर १० रुपयांचे अनुदान जमा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
टाकळी येथे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली चावडीवर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.
टाकळी येथे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली चावडीवर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

नगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर १० रुपयांचे अनुदान जमा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा, भाजप, क्रांती सेना, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, बबनराव पाचपुते, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्यासह प्रमुख नेते आंदोलनात सहभागी झाले. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दुधाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत दूध संघांनी राज्यासह नगर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे गाईच्या दुधाचा दर १५ ते २० रुपयांवर आला. या दरातून दूध उत्पादनाचा खर्च ही निघत नाही. त्यामुळे दूध व्यवसाय मोडकळीस येत आहे. त्यामुळे दुधाला दर मिळावा, दूध पावडर निर्यातीसाठी अनुदान मिळावे या मागण्यांसाठी शनिवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली.    आंदोलनाचा उत्तरेतच अधिक बोलबाला  दूध दरप्रश्नी नगर जिल्ह्यात शनिवारी आंदोलने झाली. यात उत्तर भागाचाच अधिक बोलबाला होता. अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये नेत्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दक्षिणेतील काही तालुक्यात आंदोलने झाली. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही.   असे झाले आंदोलन  

  • अकोले तालुक्यातील टाकळी येथे चावडीवर दगडाला दुधाचा अभिषेक घालत किसान सभेचे नेते व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सुरेश नवले, रोहिदास धुमाळ, सुनील पुंडे, श्रीकांत भुजबळ, गुलाबराव शेवाळे, लक्ष्मीकांत नवले, स्वप्निल नवले, सुरेश साबळे, रोहिदास सोनवणे, योगेश रक्षे, दत्तात्रय शेटे, दीपक तिकांडे, संदीप तिकांडे, दत्ताराम दातखिळे, रामहरी तिकांडे, संतु भरीतकर, विलास शेवाळे, बाळु दातखिळे आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. 
  •  कोतुळ येथे सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. रवि आरोटे, देवराम डोके, गौतम रोकडे, नामदेव साबळे, बाळासाहेब लांडे, किरण देशमुख, भानुदास देशमुख आदी या आंदोलनात सहभागी झाले. 
  • अकोले शहरात माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली दूध दरासाठी आंदोलन झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, गिरजाजी जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 
  • शेवगावमध्ये भाजपकडून दूध दरप्रश्नी आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. 
  •  श्रीगोंदा येथे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली गरम दुधाचे वाटप करून आंदोलन करण्यात आले. येथील शनिचौकात झालेल्या आंदोलनात तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. 
  •  कर्जत येथे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी शिंदे यांनी दूध दरप्रश्नी राज्य सरकारवर टिका केली. 
  •  कोंढवड (ता. राहुरी) येथे क्रांती सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महादेवाला अभिषेक करून दूध दरासाठी आंदोलन करण्यात आले. पंढरीनाथ म्हसे, जगन्नाथ म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, ज्ञानेश्वर म्हसे, किशोर म्हसे,  राहुल म्हसे, सुरेश म्हसे, भाऊसाहेब पवार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.    
  • पारनेर तालुक्यात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरासाठी आंदोलन करण्यात आले. माजी सरपंच बाबासाहेब व्यवहारे, प्रा. साजन खोडदे, प्रा. सचिन मोढवे, शिवाजी खोडदे, आदिनाथ व्यवहारे, संपत खोडदे, बाळासाहेब खोडदे, संतोष खोडदे, बाळासाहेब देशमुख  आदीसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. 
  •  श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून दूध दरासाठी आंदोलन करण्यात आले. 
  • पुणतांबा (ता. राहाता) येथील ग्रामस्थांनी दूध दरप्रश्नी आंदोलन केले.
  • राहाता येथे झालेल्या आंदोलनात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com