Farmer Agricultural News agitation for milk rate issue Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर १० रुपयांचे अनुदान जमा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

नगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर १० रुपयांचे अनुदान जमा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा, भाजप, क्रांती सेना, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, बबनराव पाचपुते, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्यासह प्रमुख नेते आंदोलनात सहभागी झाले. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दुधाला मागणी नसल्याचे कारण पुढे करत दूध संघांनी राज्यासह नगर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे गाईच्या दुधाचा दर १५ ते २० रुपयांवर आला. या दरातून दूध उत्पादनाचा खर्च ही निघत नाही. त्यामुळे दूध व्यवसाय मोडकळीस येत आहे. त्यामुळे दुधाला दर मिळावा, दूध पावडर निर्यातीसाठी अनुदान मिळावे या मागण्यांसाठी शनिवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली. 
 
आंदोलनाचा उत्तरेतच अधिक बोलबाला 
दूध दरप्रश्नी नगर जिल्ह्यात शनिवारी आंदोलने झाली. यात उत्तर भागाचाच अधिक बोलबाला होता. अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये नेत्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दक्षिणेतील काही तालुक्यात आंदोलने झाली. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही.
 
असे झाले आंदोलन 

 • अकोले तालुक्यातील टाकळी येथे चावडीवर दगडाला दुधाचा अभिषेक घालत किसान सभेचे नेते व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सुरेश नवले, रोहिदास धुमाळ, सुनील पुंडे, श्रीकांत भुजबळ, गुलाबराव शेवाळे, लक्ष्मीकांत नवले, स्वप्निल नवले, सुरेश साबळे, रोहिदास सोनवणे, योगेश रक्षे, दत्तात्रय शेटे, दीपक तिकांडे, संदीप तिकांडे, दत्ताराम दातखिळे, रामहरी तिकांडे, संतु भरीतकर, विलास शेवाळे, बाळु दातखिळे आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. 
 •  कोतुळ येथे सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. रवि आरोटे, देवराम डोके, गौतम रोकडे, नामदेव साबळे, बाळासाहेब लांडे, किरण देशमुख, भानुदास देशमुख आदी या आंदोलनात सहभागी झाले. 
 • अकोले शहरात माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली दूध दरासाठी आंदोलन झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, गिरजाजी जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 
 • शेवगावमध्ये भाजपकडून दूध दरप्रश्नी आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. 
 •  श्रीगोंदा येथे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली गरम दुधाचे वाटप करून आंदोलन करण्यात आले. येथील शनिचौकात झालेल्या आंदोलनात तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. 
 •  कर्जत येथे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी शिंदे यांनी दूध दरप्रश्नी राज्य सरकारवर टिका केली. 
 •  कोंढवड (ता. राहुरी) येथे क्रांती सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महादेवाला अभिषेक करून दूध दरासाठी आंदोलन करण्यात आले. पंढरीनाथ म्हसे, जगन्नाथ म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, ज्ञानेश्वर म्हसे, किशोर म्हसे,  राहुल म्हसे, सुरेश म्हसे, भाऊसाहेब पवार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.    
 • पारनेर तालुक्यात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे नेते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरासाठी आंदोलन करण्यात आले. माजी सरपंच बाबासाहेब व्यवहारे, प्रा. साजन खोडदे, प्रा. सचिन मोढवे, शिवाजी खोडदे, आदिनाथ व्यवहारे, संपत खोडदे, बाळासाहेब खोडदे, संतोष खोडदे, बाळासाहेब देशमुख  आदीसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. 
 •  श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून दूध दरासाठी आंदोलन करण्यात आले. 
 • पुणतांबा (ता. राहाता) येथील ग्रामस्थांनी दूध दरप्रश्नी आंदोलन केले.
 • राहाता येथे झालेल्या आंदोलनात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते.

इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...