दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात आंदोलन

सातारा : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये आणि दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे. शासनाने ३० रुपये दराने दूध खरेदी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) भाजपसह घटकपक्षांच्यावतीने सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
दहिवडी येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करताना आमदार जयकुमार गोरे, सदाशिव खाडे, बाळासाहेब मासाळ आणि कार्यकर्ते .
दहिवडी येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करताना आमदार जयकुमार गोरे, सदाशिव खाडे, बाळासाहेब मासाळ आणि कार्यकर्ते .

सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये आणि दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे. शासनाने ३० रुपये दराने दूध खरेदी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता.१) भाजपसह घटकपक्षांच्यावतीने सातारा जिल्ह्यात  ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दुधाचा दर कमी झाल्याने जनावरांना लागणारा चारा व त्यांच्यासाठी होणारा इतर खर्च हा मिळकतीपेक्षा जास्त होतो. त्यांच्या या समस्यांवर ठाम उपाययोजना व्हावी, यासाठी शनिवारी आंदोलने करण्यात आली. 

सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, किशोर शिंदे, धनंजय जांभळे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे आदी उपस्थित होते.

कराड येथील प्रशासकीय इमारतीसमोर भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शार्दुल ऊर्फ मुकुंद चरेगावकर, अॅड. विजय पाटील, नितीन शाह आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार वाकडे यांना देण्यात आले. 

मलकापूर येथे अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच पाचवड, भुईंज येथे मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप क्षीरसागर, गजानन भोसले, अर्चना विसापूरे, प्रशांत जाधवराव आदींच्या उपस्थितीत आंदोलन झाले.

शिवथर (ता. सातारा) येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने दूध दगडावर ओतून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com