Farmer Agricultural News agitation for onion price nashik maharashtra | Page 2 ||| Agrowon

कांदा दरप्रश्नी लासलगाव येथे आंदोलन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

कांद्याची आवक कमी असताना दर कोसळत असल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, परदेशांतून कांदा आयात करू नये, कांदा साठवणुकीचे निर्बंध उठवावेत व किमान निर्यातमूल्य कायमस्वरूपी रद्द करून निर्यात सुरू करून कांदा शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, कांद्याची आयात थांबवावी, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १३) लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आंदोलन करीत अर्धा तास लिलाव बंद पाडले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा देणारा दर मिळू लागला. मात्र, कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप सुरू केला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी कांदा भाववाढीविरोधात आंदोलने करून कांद्याचे दर पाडण्याचे काम सुरू केले आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शुक्रवारी आंदोलन करून अर्धा तास कांदा लिलाव बंद पाडले. कांदा दर वाढीला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष व संघटनांविरोधात, तसेच शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदवीत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी वसंत गांगुर्डे, कैलास पगारे, बाळासाहेब थोरे, गणेश निंबाळकर, जयराम गामणे, भाऊसाहेब केदार, संदीप मगर, बाळासाहेब आव्हाड यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

या वेळी कांदा उत्पादक शेतकरी शैलेंद्र पाटील म्हणाले, की सरकारने कांदा दर कमी करण्याचा हट्ट चालवला आहे. एकहाती सत्तेमुळे केंद्र सरकार अति करण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा दर पाडण्याचा हस्तक्षेप सरकारने वेळीच थांबवावा. सध्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. जर असे शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने मागे घेतले नाही, तर कांदा उत्पादक राज्यस्तरीय आंदोलन करतील.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात सव्वासात लाख टन उसाचे गाळपजळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार या...
मुंबई बाजार समिती निवडणुकीकरिता अर्ज...पुणे  ः देशातील सर्वांत मोठ्या समजल्या...
पुणे विभागासाठी १९९० कोटींच्या...पुणे  ः  पुणे विभागाच्या २०२०-२१ च्या...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
साताऱ्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण...सातारा  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत...
परमीट बंद; नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीवर...नगरः राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग...
जळगावात आले २६०० ते ५००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...