Farmer Agricultural News agitation on soybean germination issue Akola Maharashtra | Agrowon

वऱ्हाडात सोयाबीन बियाणेप्रश्नी आंदोलने

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

अकोला  ः यंदाच्या हंगामात वऱ्हाडातील अनेक गावांमधील शिवारांत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत असून, नुकसान भरपाईसाठी आंदोलने केली जात आहेत.

अकोला  ः यंदाच्या हंगामात वऱ्हाडातील अनेक गावांमधील शिवारांत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत असून, नुकसान भरपाईसाठी आंदोलने केली जात आहेत. सोमवारी (ता.२९) बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले, तर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात एक शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढला. शेतकरी संघटनेने या प्रकरणी कायदेशीर लढाई उभारण्याची तयारी केली असून शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

या हंगामात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात खरीप पेरण्यांना सुरुवात झाली. काही ठिकाणी पेरण्यांवर जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसात खंड पडला. तसेच काही कंपन्यांच्या बियाण्याची उगवण क्षमताच कमी होती. या कारणांमुळे सोयाबीन पिकाची उगवण जेमतेम झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी मोडावी लागली. हा खर्च पाहता शेतकऱ्यांकडून शेकडोंच्या संख्येत तक्रारी आलेल्या आहेत. प्रामुख्याने खाजगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई कशी मिळेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. कंपन्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. यामुळे रोष वाढला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे साडेपाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन बियाणे उगवलेले नसल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. ही संख्या दररोज वाढत आहे. कृषी विभागाकडून गावोगावी पाहणी केली जात असली तरी मदतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करीत रविकांत तुपकर यांनी सोमवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. संध्याकाळपर्यंत हे  आंदोलन सुरुच होते.

बाळापूर तालुक्यातील टाकळी येथील महादेव नाजूकराव वानखडे या शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. प्रशासनाने ताबडतोब बियाणे द्यावे अशी मागणी कृषी विभागाकडे करीत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढून आंदोलन केले. 

शेतकरी संघटना करणार न्यायालयीन लढ्यासाठी मदत 
या हंगामात महाबीजसह विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. ज्यांचे बियाणे उगवले नसेल अशा शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. या कंपन्यांविरुद्ध ग्राहक मंचामध्ये जायचे असल्यास त्यासाठी  ॲड.सतीश बोरूडकर हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. तसेच सर्व तांत्रिक बाजूची माहिती देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष्मीकांत कौठकर यांच्याशी (अध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना, अकोला) ९६२३६०३७९९ या मोबाईक क्रमांकावर किंवा  lkauthakar@gmail. com या ईमेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...