‘पोकरा’वरील बहिष्कार आंदोलन कृषी सहायकांकडून मागे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः विविध मागण्यांसाठी १२ डिसेंबरपासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या योजना अंमलबजावणीवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. याबाबत संघटनेने कृषी आयुक्तांना पत्र देत हे आंदोलन स्थगित केल्याचे म्हटले आहे.

पोकरा प्रकल्पातील योजनांच्या अंमलबजावणीची प्रमुख जबाबदारी ही गाव संजीवनी समितीचा तांत्रिक सदस्य असलेल्या कृषी सहायकांवर टाकण्यात आलेली आहे. विविध विभागांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, समितीचे आर्थिक व्यवहार सांभाळणे, खर्चाचे तपशील ठेवणे या कामांना कृषी सहायकांचा सुरुवातीपासून विरोध आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. पोकरा प्रकल्प संचालक, कृषी आयुक्त, कृषिमंत्र्यांसोबच चर्चा केली. परंतु आश्‍वासनाशिवाय काहीही मिळाले नव्हते. त्यामुळे १२ डिसेंबरपासून १५ जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी संपूर्ण बहिष्कार आंदोलन सुरू केले होते.

यामुळे ‘पोकरा’च्या संपूर्ण योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली होती. निधी खर्च होण्यात अडथळे येत होते. अखेरीस आयुक्तस्तरावर या प्रकल्पातील अडचणीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे कृषी सहायक संघटनेने मंगळवारपासून (ता. ७) आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना दिले आहे. 

‘...तर पुन्हा आंदोलन’ कृषी सहायकांचे प्रश्‍न महिनाभरात सोडवावेत, असे न केल्यास महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना स्थगित केलेले बहिष्कार आंदोलन पुन्हा सुरू करेल, असा इशाराही सरचिटणीस वसंत जारीकोटे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com