शेतकऱ्यांचा सन्मान करुन अमरावती कृषी विभागाने साजरा कृषीदिन

अमरावती: कृषीदिनाच्या पारंपरिक सोहळ्यांना फाटा देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने थेट शेतकऱ्यांकडे श्रमदान करून कृषिदिन साजरा करण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी शेतकऱ्यांचे पूजन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी शेतकऱ्यांचे पूजन केले.

अमरावती: कृषीदिनाच्या पारंपरिक सोहळ्यांना फाटा देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने थेट शेतकऱ्यांकडे श्रमदान करून कृषिदिन साजरा करण्यात आला. तसेच बुधवारी आषाढी एकादशी होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये श्री विठ्ठलाचे रूप पाहात वयोवृद्ध ११ शेतकऱ्यांचे पाय धूत त्यांना उपरणे, टोपी आणि श्रीफळ दिले. कृषी विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते. 

तसेच शेतकऱ्यांकडे बारमाही भाजीपाला उत्पादन व्हावे याकरिता परसबाग संकल्पना साकारण्यात आली. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाउनमुळे पारंपरिक रितीने सभागृहांमध्ये अनेकांच्या उपस्थितीत कृषीदिन साजरा करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जात कृषिदिन साजरा करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या होत्या.

अमरावती जिल्हा कृषी विभागाने मात्र त्यातही वेगळेपण जपले. पिंपरी येथील नीलेश महाले या शेतकऱ्याच्या घरात जवळील जागेत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परसबागेचा पर्याय महाले कुटुंबीयांना उपलब्ध करून देण्यात आला. याद्वारे बारमाही भाजीपाला या कुटुंबाला मिळणार आहे. परसबागेत सोबतच पिंपरी गावातील विठ्ठल महाले यांच्या शेतावर फळझाडे लावण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com