Farmer Agricultural News agriculture department gives fertilizers at farm Aurangabad Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी मिळणार बांधावर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार मेट्रिक टन रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम उद्या (ता. ४) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार मेट्रिक टन रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम उद्या (ता. ४) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

श्री शिंदे म्हणाले, कृषी आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार ‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी शेतकरी गटांमार्फत गटातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३० मेपर्यंत जिल्ह्यात ६३०७.२८ टन रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले आहे. हा उपक्रम अधिक गतिमान करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी गावातील शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी मित्र, कृषी ताई यांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध गावांत एकाच दिवशी पाच हजार टन रासायनिक खते शेतकऱ्यांना बांधावर पोहोच करण्याचा उपक्रम हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

येत्या गुरुवारी (ता.४) जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खत वाटपासाठी प्रति गाव पाच ते दहा टन खतपुरवठ्याचे नियोजन करण्याचे यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खताची मागणी नोंदविण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली जात आहे. त्या लिंकच्या आधारे शेतकऱ्यांना आपली खतांची मागणी नोंदविता येणार आहे. युरिया खताची २२५० टनाची रॅक या मोहिमेसाठी राखून ठेवण्यात आली आहे.

या उपक्रमा अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व मंडळ कृषी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका ठिकाणी रासायनिक खते वाटप करण्यासाठी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे अधिकारी सदर प्रात्यक्षिकास हजर राहणार नाही, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर आवश्यक असणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

उत्कृष्ट काम करणाऱ्यांना मिळणार बक्षीस
एकाच दिवशी पाच हजार मेट्रिक टन रासायनिक खते शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच करण्याच्या उपक्रमात उत्कृष्ट काम करणारे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आदींना बक्षिसेही दिली जाणार आहे. जे सर्वाधिक रासायनिक खते शेतकऱ्यांना बांधावर वाटप करतील त्यांना प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांची, व्दितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचे व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या तीन बक्षिसांव्यतिरिक्त प्रत्येकी एक हजार रुपयांची दोन प्रोत्साहनपर बक्षीसेही दिली जाणार असल्याची माहिती बाळासाहेब शिंदे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...