Farmer Agricultural News agriculture department urges to farmers to take Receipt of fertilizer, seed purchase Pune Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनो, खते, बियाण्यांची बिल पावती घ्या ः कृषी विभाग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

पुणे  ः खरीप हंगामासाठी खते, बियाणे, किटकनाशके खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पुणे  ः खरीप हंगामासाठी खते, बियाणे, किटकनाशके खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित दुकानदाराकडून संपूर्ण विवरणासह बिल पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने काही कृषी सेवा केंद्रे अधिक दराने निविष्ठा विक्री करत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल होत आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बिल पावती घेण्याचे आवाहन केले जात आहे. खते, बियाणे, किटकनाशके, मशागत आदिसाठी शेतकऱ्यांना आर्थिक गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे गुणवत्ता व चांगल्या दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी करावी. शेतकऱ्यांनी भेसळीची शंका दूर करण्यासाठी सीलबंद, वेष्ठनातील, लेबल असलेले बियाणे खरेदी करावे, वैध मुदतीची खात्री करावी, पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने खरेदी करू नये.

खरेदी केलेल्या बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे. ते नाव, किमान किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही असलेली रोख अथवा उधारीची पावती घ्यावी. ही पावती तसेच वेष्टन बॅग, त्यावरील लेबल व त्यातील थोडे बियाणे या गोष्टी पिकांची कापणी होईपर्यत जपून ठेवाव्यात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी केले.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...