Farmer Agricultural News Agriculture department will take initiative for direct sales of agricultural goods Nagar Maharashtra | Agrowon

शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला जाणार : कृषी विभाग घेणार पुढाकार 

सुर्यकांत नेटके
बुधवार, 8 एप्रिल 2020

लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्रीची अडचण दूर करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विक्री व्यवस्था उभी केली. बहुतांश भागात शेतकरी गट, शेतकरी कंपनी व शेतकरी थेट ग्राहकांना शेतीमाल विक्री करताना दिसत आहेत. मुळात शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री ही जुनीच संकल्पना आहे. आता आपत्तीच्या निमित्ताने ही साखळी आणि शेतकरी ते ग्राहक समन्वय अधिक दृढ होत आहे. भविष्यात ही साखळी कायम राहावी यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. 
— सुहास दिवसे, कृषी आयुक्त. 

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने भाजीपाला, फळे विक्रीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकरी गट, कंपन्यांसह अन्य शेतकरी थेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीचा प्रयत्न करीत असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहेत. आपत्तीच्या निमित्ताने शेतकरी ते ग्राहक यांच्यातील समन्वय चांगला होत असून आगामी काळातही हा समन्वय टिकवून ठेवत तो अधिक भक्कम करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. 
 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा भाजीपाला, फळे, व शेतीमाल विक्रीवर परिणाम झाला आहे. मात्र सध्याच्या आपत्तीच्या काळात  शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने प्रशासनाच्या मदतीने भाजीपाला, फळे  विक्रीचे नियोजन केले आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी गट, शेतकरी कंपन्या व काही शेतकरी थेट ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांची विक्री करीत आहेत. अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद आहेत. परराज्य तसेच परदेशातही निर्यातही होत नाही.

त्यामुळे नेहमीच्या तुलनेत दर काहीसे कमी मिळत असले तरी थेट ग्राहकांना शेतीमाल विक्री करता येत असल्याने शेतकऱ्यांना होणारा तोटा तितकासा नाही. शिवाय ग्राहकही रास्त दरात ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने समाधानी आहेत. मोठ्या शहरातील वस्त्या, अपार्टमेंटमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दहा दिवसांत सुमारे सोळा हजार टनांपेक्षा अधिक भाजीपाला, फळे शेतकऱ्यांना विक्री करता आली. राज्यभरातील सुमारे अडीच ते तीन हजार शेतकरी गट, कंपन्यांनी सध्याच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात शेतमाल विक्रीबाबतची मध्यस्थांची साखळी तोडून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना राबवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून कृषी महोत्सवासारखी संकल्पना नगर जिल्ह्यातून सर्वप्रथम उदयाला आली. मात्र अनेक वेळा प्रयत्न करुनही त्याला आत्तापर्यंत तरी फारसे यश आले नाही. आता ‘बंद’च्या निमित्ताने शेतकरी ते ग्राहक समन्वय साधला जात असून पुन्हा कृषी विभागाने हा समन्वय अधिक भक्कम करत आगामी काळातही या पद्धतीने शेतीमाल विक्री सुरु राहील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या आहेत.

सध्या आंब्याचा हंगाम असून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्यातीला अडचण येत आहे. त्यामुळे आंबा विक्रीतही शेतकरी ते ग्राहक संकल्पना अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नगर जिल्ह्यात सुरु झालेली शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री व्यवस्था ‘बंद’नंतरही सुरुच राहील, यासाठी आम्ही नियोजन करत असल्याचे नगरचे समन्वयक श्रीकांत जावळे यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....