महिनाअखेरपर्यंत पीककर्ज उद्दिष्टपूर्ती करावी ः कृषिमंत्री दादा भुसे

पीककर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बँकांनी सुलभ करावी, यासाठी शेतकऱ्यांना घरी बसून अर्ज करता येईल असे अॅप तयार करावे. - दादा भुसे, कृषिमंत्री
कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

वर्धा  : शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. पेरणी होण्यापूर्वी ९० टक्के कर्ज वाटप पूर्ण होणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील ७३ टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना बँकांनी आत्तापर्यंत केवळ २७ टक्के कर्ज वाटप केल्याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जुलैअखेरपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना  दिले. 

कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषिमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर असून, ते विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. वर्धा जिल्ह्यात सोमवारी (ता. ६) भिडी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून जिल्हा परिषद सभागृहात त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी पीक कर्जाबाबत लीड बँक व्यवस्थापक यांना निर्देश दिले.  बैठकीला आमदार रणजित कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की राज्य शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत ३८ हजार २७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ३४३ कोटी रुपये जमा केले आहेत. शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची पत निर्माण व्हावी आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळावे, यासाठी बँकांना पैसे देण्यात आलेले आहेत. हा निधी लॉकडाउनपूर्वी वितरित केलेला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीत बँकांनी किमान या ३८ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज प्रकरणावर प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र, बँका शेतकऱ्यांना योग्य प्रतिसाद देत नसतील तर याबाबत कठोर पाऊल उचलण्यात येईल. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांनी दर दोन दिवसांनी बँकांचा आढावा घ्यावा. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसतील आणि टाळाटाळ करत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com