Farmer Agricultural News Agriculture Minister interacts with farmers Nagpur Maharashtra | Agrowon

शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा मार्ग : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

प्रयोगशील शेती ही काळाची गरज असून, शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक शासन तयार करणार आहे.
- दादा भुसे, कृषिमंत्री.

नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून, मूल्यवर्धित पीकपद्धती आणि गुणवत्ता, दर्जा राखून आर्थिक प्रगती साधता येईल, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. 

मांडवा (ता. हिंगणा) येथे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मांडवा येथील प्रगतशील शेतकरी बळवंतराव डढमल यांच्या शेतात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती टिपेश्वर वैद्य, सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंग, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यावेळी उपस्थित होते.

या वेळी श्री. भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतशिवाराची पाहणी केली; तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.  शेतकऱ्यांनी शेतीचा आराखडा करण्यासोबतच व्यापारी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. राज्यातील एकही शेतकरी खते व बियाण्यांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही श्री. भुसे या वेळी दिली.

अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून, या समितीचा अहवाल प्राप्त होताच, दोषी असणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या समितीने सोयाबीनचे आतापर्यंत पन्नास हजार नमुने तपासले आहेत. हा अहवाल शासनास लवकरच सादर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
सोलापुरात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी...सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा...
तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रारअमरावती: तिवसा तालुक्यातील अनकवाडी मालपूर...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....