Farmer Agricultural News agriculture minister speaks about kharip planning Nagar Maharashtra | Agrowon

शासन करणार ५० हजार टन युरियाचा बफर स्टॉक  : कृषिमंत्री दादा भुसे 

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

 नगर  : राज्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केलेली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ५० हजार टन युरियाचा बफर स्टॉक सरकार करत असून शेतकऱ्यांनी यासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्चात दर्जेदार शेतीमालाची निर्मिती करावी असे आवाहन कृषि मंत्री दादा भुसे यांनी केले.

 नगर  : राज्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केलेली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ५० हजार टन युरियाचा बफर स्टॉक सरकार करत असून शेतकऱ्यांनी यासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्चात दर्जेदार शेतीमालाची निर्मिती करावी असे आवाहन कृषि मंत्री दादा भुसे यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन खरीप पीक परिसंवादाचा समारोप श्री. भुसे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम. भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, प्रा. माधव देसाई, सचिन सदाफळ यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुसे म्हणाले, की गाव शिवारातील ओढे, नदी, नाले यावर बंधारे बांधण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेवू. पाट पाणी वाटपाच्या संदर्भात सर्व पाणी वापर संस्थांना सर्व शेतकऱ्यांना समन्यायी वाटप करण्यासंबंधी सांगण्यात येईल. भाडेतत्वावर वापरण्यासाठी प्रत्येक गावासाठी ट्रॅक्टर देवू, जेणेकरुन गावातील सर्व शेतकऱ्यांना त्या ट्रॅक्टरचा उपयोग होईल. लहान अवजारे कुटुबांना पुरवता आली तर त्यांची गुजराण त्याच्यावर होऊन त्यांना फायदा होईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासंबंधी लवकरच निर्णय घेवू. येत्या १० दिवसात उर्जा विभागाचे नवीन धोरण येत आहे. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सौरपंप पुरविण्यासंबंधी निर्णय घेवू.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यावर्षी शेतकऱ्यांसाठी १९०० क्विंटल बियाणे, २४ लाख फळपिकांची रोपे, २५० क्विंटल जैविक खते, ४५० क्विंटल जैविक किटकनाशके विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विक्री केंद्रांवर उपलब्ध केलेली आहेत, असे कुलगुरू डाॅ. विश्वनाथा यांनी सांगितले.

विवेक माने व प्रमोद पाटील या शेतकऱ्यांसह डॉ. सुनिल कराड, डॉ. एच.टी. पाटील, डॉ. बी.एस. रासकर, डॉ. सतिश जाधव, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. मधुकर भालेकर या शास्त्रज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. पंडित खर्डे यांनी तर आभार डॉ. शरद गडाख यांनी मानले. या दोन दिवसीय परिसंवादात राज्यातून ५०० पेक्षा जास्त शेतकरी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...