Farmer Agricultural News agriculture minister take a review of damaged crops Parbhni Maharashtra | Agrowon

हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा ः कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

हिंगोली  ः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

श्री. भुसे यांनी रविवारी (ता.२७) हिंगोली येथे आयोजित बैठकीमध्ये हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर औंढा तालुक्यातील नुकसानीची पाहणीची केली. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस आदी सुमारे १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतचा आढावा श्री. भुसे यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण संगेवार, हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे उपस्थित होते. 

त्यानंतर श्री. भुसे यांनी हिवरा जाटू, काठोडा तांडा, औंढा नागनाथ आदी गावांतील पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांची संवाद साधत धीर दिला. मदतीचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु येथील ग्यानदेव उघडे यांच्या शेतातील सोयाबीन नुकसानीची पाहणी श्री. भुसे यांनी केली. काठोडा तांडा येथील शेतकरी विठ्ठल बुचके यांच्या  शेतातील पिकाची पाहणी त्यांनी केली. विकेल ते पिकेल संकल्पने अंतर्गत औंढानागनाथ येथे भाजीपाला, फळे स्टॉलचे उद्घाटन श्री. भुसे यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...