शेतकऱ्यांच्या घामाला न्याय द्यावा : कृषिमंत्री दादा भुसे

शेतकऱ्यांनी एखाद्या योजनेसाठी एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा त्यांना अर्ज करावा लागू नये, यासाठी प्रणाली तयार करण्यात येणार आहे. - दादा भुसे, कृषिमंत्री.
कोणे येथे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने भात लागवड करून कृषी संजीवनी सप्ताहात सहभाग नोंदविला.
कोणे येथे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने भात लागवड करून कृषी संजीवनी सप्ताहात सहभाग नोंदविला.

नाशिक  : स्वतःच्या जिवावर उदार होऊन शेतकऱ्यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीतही घाम गाळला. कुणालाही अन्नधान्याच्या अनुषंगाने अडचण भासू दिली नाही. समाजाने शेतकऱ्यांच्या घामाला न्याय दिला पाहिजे. सर्व बंद होते, तेव्हा शेती सुरू होती. हे श्रेय शेतकऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने १ ते ७ जुलैदरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ कोणे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे उपस्थित होते. 

श्री. भुसे म्हणाले, की शेतकरी चिंतामुक्त व्हावा हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी शासकीय योजना काटेकोरपणे राबवण्यात येत आहेत. यंदा पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येईल. यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. चालू वर्षात पेरण्या वेळेवर आहेत. रासायनिक खतांची टंचाई भासणार नाही. युरियाचा तुटवडा भासू नये यासाठी बफर स्टॉक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. २५ टक्के महिलांच्या शेतीशाळा घेतल्या जाव्यात अशा सूचना दिल्या आहेत. एका महिलेला शिकवले तर संपूर्ण कुटुंबाला शिकवल्यासारखे आहे, म्हणून ५० टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न असतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com