हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहास प्रारंभ

नगर ः माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्ताने बुधवारी (ता. १) आदर्श गाव हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहास प्रारंभ झाला.
हिवरे बाजार येथे कृषी सप्ताह कार्यक्रमानिमित्त शेतकरी-वारकरी दिंडी काढण्यात आली.
हिवरे बाजार येथे कृषी सप्ताह कार्यक्रमानिमित्त शेतकरी-वारकरी दिंडी काढण्यात आली.

नगर  ः माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्ताने बुधवारी (ता. १) आदर्श गाव हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहास प्रारंभ झाला. 

आमदार नीलेश लंके, आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल गवळी, बाभळेश्‍वरच्या केव्हीकेचे प्रमुख डॉ. संभाजी नालकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हिवरेबाजार येथे कृषी सप्ताह प्रारंभानिमित्त सुरवातीला शेतकरी-वारकरी दिंडी काढण्यात आली. त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी सेंद्रिय शेती उपक्रम, सुधारित बियाणे, सेंद्रिय कर्बवाढीच्या दृष्टीने उपाययोजना, सीताफळ लागवड आदींबाबत शेतकरी, ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. हिवरेबाजार येथे चालू वर्षी १५ हेक्टरवर सीताफळ वाणाची लागवड करण्यात आली असून या शेतकऱ्यांना फळबागांपासून अधिक उत्पादन अधिक लाभ मिळवून देण्याचे काम कृषी विभागामार्फत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी अरविंद पारगावकर, श्रीकांत गाडे, मंडळ कृषी अधिकारी रामदास तुंबारे, शेखर देशमुख, ईश्‍वर हांडे आदींसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com