Farmer Agricultural News Ajit Pawar take a review of crops damage Pune Maharashtra | Agrowon

नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो निर्णय घेऊ : अजित पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज (ता.६) लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेऊन मदत केली जाईल. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारसह आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज (ता.६) लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेऊन मदत केली जाईल. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारसह आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

श्री. पवार यांनी शुक्रवारी (ता.५) सकाळी जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. 

दरम्यान, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.५) जुन्नर तालुक्यातील वडज, येणेरे, निरगुडे, जुन्नर, ओतूर, नारायणगाव आदि भागांतील नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्याचे श्री. आढळराव यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...