`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील ८४० ग्रामपंचायतींना सावध राहण्याचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः कोरोना विषाणूबाबत सावध राहण्याचे निर्देश जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून देण्यात आले आहेत. 

चीनमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण आढळल्यानंतर अनेक देशांमध्ये त्याचा प्रसार झाला. भारत आणि महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविणे व विषाणूमुळे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. त्याची पूर्वतयारी करून प्रत्यक्ष अंमलबजावणीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी ८४० ग्रामपंचायतींना कार्यवाहीबाबत सूचना दिल्या आहेत. 

या करा उपाययोजना ग्रामपंचायत स्तरावर आवश्‍यक पूर्वतयारी व अंमलबजावणी करण्यात यावी. गावांमध्ये फिरणाऱ्या घंटागाड्यांद्वारे कोरोना विषाणूबाबत जनजागृती करावी. कोरोना विषाणूची लक्षणे ही श्‍वास घेण्यास त्रास, न्यूमोनिया, ताप अशी श्‍वसनसंस्थेशी निगडित आहेत. त्याचा प्रसार हा प्रामुख्याने शिंकणे, खोकणे यातून होत असल्याने नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. यासाठी घंटागाड्यांवर ऑडिओ क्‍लीपद्वारे व माहितीपत्रकाद्वारे जागृती करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com