नाशिकमध्ये मक्यावर तीन ते चार टक्के अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव 

७ जूनच्या मका लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यावर रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. - विजय पगार, शेतकरी, कळवण, जि. नाशिक.
चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात दिसून आलेला अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात दिसून आलेला अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

नाशिक : जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मका पिकावर दिसून येत आहे. सध्या इतर पिकांवर हा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणल्याचे पाहणी दरम्यान समोर आले आहे. हा प्रादुर्भाव ३ ते ४ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात सर्वाधिक मका लागवड नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, येवला व चांदवड तालुक्यांत असून येथे हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सुरुवातीला देवळा व सटाणा तालुक्यातील काही भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने व पाऊस झाल्याने हा प्रादुर्भाव कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी जिल्ह्यात ४९ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. ७६६ गावांमधील ३६ हजार ६७५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. मात्र, ही पातळी कमी झाल्याचे समोर आले आहे. 

जिल्ह्यात कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर पाहणी करून कृषी विभाग व तज्ज्ञांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया

जिल्ह्यामध्ये मका सोडून अन्य पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. मागील वर्षी हा प्रादुर्भाव २५ ते ३० दिवसांच्या मका पिकावर साधारण २० ते २५ टक्क्यांपर्यंत होता. या वर्षी सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा या तालुक्यांमध्ये २५ ते ३० दिवसांपर्यंतच्या मका पिकावर साधारण ५ ते १० टक्क्यांपर्यंत तसेच नांदगाव तालुक्यामध्ये ५ टक्क्यांपर्यंत हा प्रादुर्भाव दिसून आला आहे.  - विशाल चौधरी, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, मालेगाव कृषी विज्ञान केंद्र    चांदवड, निफाड तालुक्यांत प्रत्यक्ष क्षेत्रावर भेट देऊन पाहणी केली असता, संबंधित क्षेत्रावर ३० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला आहे. ज्या लागवडी हंगामाच्या सुरुवातीला झाल्या आहेत त्यावर प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यातील आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केल्यास प्रादुर्भाव नियंत्रित होऊ शकतो.  -तुषार उगले, कीटकशास्त्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com