Farmer Agricultural News average rainfall in district Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली पूर्ण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच जूनमध्ये पावसाने सर्वदूर हजेरी लावत या महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात सरासरी १९८.६ मिमी पाऊस होतो. यावर्षी २००.९ मिमी पाऊस झाला आहे.

सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच जूनमध्ये पावसाने सर्वदूर हजेरी लावत या महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात सरासरी १९८.६ मिमी पाऊस होतो. यावर्षी २००.९ मिमी पाऊस झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात रोहिणी, मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात जूनच्या पावसाची सरासरी पूर्ण झाली आहे. जुलैमध्ये सोलापूर जिल्ह्यात १२६.७ सरासरी मिमी पाऊस होतो. जुलैमध्ये आतापर्यंत ७७.६ मिमी पाऊस झाला आहे. तसेच जुलैमध्ये होणाऱ्या एकूण सरासरी पावसाच्या ६१.२ टक्के पाऊस झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे.

१९ जुलैला सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होत आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती वाहन असल्याने मुसळधार पाऊस पडणार असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. गेल्या वर्षी पावसाने जुलैनंतर मोठी ओढ दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप वाया गेला होता. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार या महिन्यातही दमदार पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
 
खरीप पिकांना फायदा

सोलापूर जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असला, तरी खरिपातही मोठ्या प्रमाणात पिके घेतली जात आहेत. सोलापूर जिल्ह्याचा समावेश गेल्या वर्षीपासून खरीप हंगामात करण्यात आला आहे. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी यंदा २ लाख ३४ हजार हेक्टर इतके उद्दिष्ठ घेतले आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे जूनअखेर पहिल्याच महिन्यात पेरणीची टक्केवारी १०० टक्क्यांपुढे गेली आहे. तूर, सोयाबीन, मूग, सूर्यफूल, मका या प्रमुख पिकांचा त्यात समावेश आहे. या पावसाचा फायदा या पिकांना होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...