Farmer Agricultural News Bacchu kadu says Do not plant pre-season cotton Akola Maharashtra | Agrowon

पूर्वहंगामी कपाशी लागवड करु नका ः पालकमंत्री बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

अकोला  ः आगामी हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

अकोला  ः आगामी हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यात या हंगामात १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ७० टक्के कोरडवाहू व ३० टक्के ओलित क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पाकिटांचा पुरवठा केला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून १.६० हेक्टर क्षेत्रासाठी ८ लाख बियाणे पाकिटे वितरकांकडे पोहोच झाली आहेत. त्यामुळे कापूस बियाण्याचा मुबलक पुरवठा झाला आहे. केंद्र शासनाने कपाशी बियाण्याच्या किंमती ठरवून दिल्या असून बीजी-१ साठी ६३५ रुपये प्रतिपाकीट व बीजी-२ साठी ७३० रूपये प्रतिपाकीट असा दर आहे. जिल्ह्यात ६४० बियाणे विक्री परवानाधारक असून त्यांच्यामार्फत बियाणे उपलब्ध होणार आहे.

कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बोंड अळीचे जीवनचक्र खंडीत करणे हा एकमात्र चांगला यशस्वी उपाय आहे. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होवून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी पूर्वहंगामी कपाशी लागवड करू नये, असे आवाहन श्री.कडू यांनी केले आहे.

मागील वर्षी २०१९-२० मध्ये ज्याप्रमाणे १ जूननंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कपाशी बियाण्यांची विक्री केली होती. त्याप्रमाणे यावर्षी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यासंदर्भात कोणतीही काळजी करू नये व हंगामपूर्व कपाशी लागवड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...