सातबारा उताऱ्याच्या ‘धंद्या’वर बंदी; गुन्हे दाखल होणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे :  राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेल्या सातबारा उताऱ्याची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सेवा केंद्रचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

संगणकीय सातबारा उतारे तयार होताच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या भूलेख संकेतस्थळावरून ते जनतेला उपलब्ध करून दिले जात होते. या संकेतस्थळावर गाव नमुना क्रमांक, सात-बारा आणि आठ-अ उतारा जनतेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिलेला होता. या प्रक्रियेसाठी राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, काही ठिकाणी केंद्रचालकांनी या उताऱ्याचा ‘धंदा’ सुरू केला.

“सातबारा आणि आठ-अ असे दोन्ही उतारे ई-महाभूमीवर उपलब्ध आहेत. तसेच  ‘फक्त पाहण्यासाठी’ असे छपाई केलेले सातबारा उतारे जनतेला अतिशय उपयुक्त ठरतात.  ही यंत्रणा राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. मात्र, केंद्रचालकांकडून या सुविधेचा गैरवापर सुरू असल्याचे पुरावे महसुल खात्याने माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले होते.

केंद्रचालक गैरवापर करीत असल्याची खात्री पटल्यानंतर आता भूलेख व महाभूमी संकेतस्थळावरील सातबारा आणि आठ-अ उतारे (वॉटरमार्क असलेले) कोणत्याही शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा आदेश शासनाने दिला आहे. आपले सरकार सेवा केंद्रचालक आता या उताऱ्यांवर सत्य पडताळणी केल्याचा सही शिक्का मारून कोणालाही उतारे देणार नाहीत, असे महसुल विभागाने बजावले आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश या उताऱ्यांचा गैरवापर होत असल्याचे कळताच संबंधित तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com