Farmer Agricultural News Bandhara damage in first rain Nagar Maharashtra | Agrowon

मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच पाण्यात गेला वाहून 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर बंधाऱ्याचा भराव पुन्हा एकदा वाहून गेला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या जोरदार पावसाने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत गुरुवारी पाणी सोडल्याने हा भराव वाहून गेला.

नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर बंधाऱ्याचा भराव पुन्हा एकदा वाहून गेला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या जोरदार पावसाने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत गुरुवारी पाणी सोडल्याने हा भराव वाहून गेला. तब्बल दहा महिन्यानंतर आठ दिवसापूर्वी बंधाऱ्याचा वाहून गेलेला भराव भरण्याचे काम सुरु केले होते. आता पावसाळा सुरु होत असल्याने बंधाऱ्याचा भराव भरला जाईलच याची शाश्वती नसल्याने नदीकाठचे शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. 

कोपरगाव तालुक्यातील मंजुर गावासह परिसरातील शेतीसाठी गोदावरी नदीवर १९८९-९० मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने गोदावरी नदीवर कोल्हापुर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. सोबत सुमारे पंधरा शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर लोकप्रतिनिधींनी बैठका घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही भरपाई मिळालेली नाही. 

बंधाऱ्याचा भराव भरणार असल्याचे सांगितले आणि आता कुठे पावसाळ्याच्या तोंडावर हे काम सुरु केले. मात्र चार दिवस काम होत नाही तोच निसर्ग चक्रीवादळाने नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १६ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चार दिवसांपूर्वी टाकलेला भराव वाहून गेला. जमिनी आणि भराव वाहून गेला त्यास तब्बल दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आणि आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच नेमके काम सुरु कसे केले असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी या कामावरच शंका उपस्थित करत आहेत. 

चौथ्यांदा फुटलाय बंधारा 
पुराच्या पाण्याने होत्याचे नव्हतं केलेल्या मंजुर गावातील या गोदाकाठच्या बंधाऱ्यांचे काम करताना गाईडवॉल केलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी केलेला तात्पुरता माती आणि वाळूचा भराव वाहून गेला आणि नदीने प्रवाहच बदलला आहे. हा बंधारा तिसऱ्यांदा फुटला आहे. याआधी २००६ आणि २०१७ मध्ये बंधारा फुटला होता. तरीही दखल घेतली नसल्याने यंदा पंधरा एकर शेती, सात विहिरी, अकरा पाइपलाइन वाहून गेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी हा बंधारा फुटला, त्यानंतर पुन्हा साइड भराव टाकण्यासाठी याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती दिलेली होती. आता पुन्हा यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच चौथ्यांदा भराव वाहून गेला. 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...