Farmer Agricultural News Below average rainfall in district Akola Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी देत चांगली सुरुवात केली खरी, मात्र नंतरच्या काळात जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने जून महिन्यात सरासरीइतक्या पावसाची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात जूनमध्ये ९२.४ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाचा हंगामातील पीक लागवडीवर मोठा परिणाम झालेला आहे. 

अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी देत चांगली सुरुवात केली खरी, मात्र नंतरच्या काळात जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने जून महिन्यात सरासरीइतक्या पावसाची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात जूनमध्ये ९२.४ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाचा हंगामातील पीक लागवडीवर मोठा परिणाम झालेला आहे. 

या हंगामाची सुरुवात जोरदार झाल्याने जूनमध्ये समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. यंदा मृगातच पाऊस सुरू झाल्याने पेरण्यांना प्रारंभ झाला होता. नंतरच्या काळात जिल्ह्यात पावसात खंड पडला. १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे तज्ज्ञांकडून वारंवार आवाहन करण्यात आले तरी शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरणी केली. यामुळे काहींची पेरणी साधली. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रामुख्याने सोयाबीन बियाणे मात्र उगवले नाही. यामुळे बियाणे कंपन्यांविरुद्धच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

पहिल्याच महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याचा फटका लागवडीला बसलेला आहे. पावसातील ही तूट प्रामुख्याने मूर्तिजापूर तालुक्यात अधिक आहे. येथे सरासरीच्या केवळ ६८ टक्केच पाऊस पडलेला आहे. याशिवाय अकोट येथे ९६.३, बाळापूर येथे ९१.६, बार्शीटाकळीत ८४.५, अकोल्यात ९३.१ मिमी असा पाऊस नोंद झाला आहे. शिवाय जिल्ह्यात जूनमधील सरासरी इतका पाऊस झालेला नाही. जून महिना उलटला तरी दिवसाच्या तापमानात घट झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 
 

तालुकानिहाय पाऊस स्थिती मिलिमीटरमध्ये (माहिती स्रोत ः कृषी विभाग)
तालुका   जूनमधील सरासरी प्रत्यक्षात पडलेला पाऊस टक्केवारी
अकोट  १२४.५  ११९.९  ९६.३
तेल्हारा  १२० १४४.४ १२०.३
बाळापूर  १३० ११९.२ ९१.६
पातूर    १५५  १७३  १११
अकोला १३४ १२५  ९३.९
बार्शीटाकळी १४८  १२५  ८४.५
मूर्तिजापूर १४५ ९९.३ ६८.१  
एकूण १३६   १२६  ९२.४

 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...