Farmer Agricultural News black gram sowing status Nagar maharashtra | Agrowon

नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

नगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात उडदाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत सुमारे १७ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली असून ही सरासरीच्या तुलनेने अधिक आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात यंदा उडदाचे क्षेत्र अधिक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात उडदाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत सुमारे १७ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली असून ही सरासरीच्या तुलनेने अधिक आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात यंदा उडदाचे क्षेत्र अधिक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नगर जिल्ह्यात उडदाचे सरासरी क्षेत्र १७ हजार ५९६ हेक्टर आहे. यंदा सुरवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने मूग, उडीद, तुरीच्या पेरण्यांना वेग आला. उडदाची आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र संगमनेर, अकोले, राहाता, श्रीरामपूर, श्रींगोदा, राहुरीत उडदाचे क्षेत्र अल्प आहे. 

कर्जत, जामखेड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ३२ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा अजून पेरणी क्षेत्र कमी असले तरी सुरवातीला लवकर झालेल्या पावसामुळे क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या खरिपाची पेरणीही सरासरीच्या जवळ आली आहे. मात्र अजून वाफसा नसल्याने अनेक भागांत पेरणी थांबली आहे. दोन दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात उसंत दिल्याने उर्वरित पेरण्यांना वेग येणार आहे. 

तालुकानिहाय उडीद पेरणीचे क्षेत्र (हेक्टर) : नगर ः ४१४, पारनेर ः ६२, श्रीगोंदा ः ४५, कर्जत ः ११,९०८, जामखेड ः ३५३६, शेवगाव ः २४०, पाथर्डी ः ११३८, नेवासा ः २८९, राहुरी ः ३९, संगमनेर १, अकोले ः ३, कोपरगाव ः ४०, श्रीरामपूर ः ४, राहाता ः ८.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...