farmer agricultural news cabbage price increase kolhapur maharashtra | Agrowon

कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’

राजकुमार चौगुले
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मी अल्पभूधारक शेतकरी आहे. काही गुंठ्यांत मी कोबीचे उत्पादन घेतो. गेल्या महिन्यात १५ ते २० रुपये एक गड्डा या दराने मी कोबी विकत होतो. पण मागणीत मोठी वाढ झाली. यामुळे बाजारातील दरही वाढले. सध्या २५ ते ३० रुपयांच्या आसपास गड्ड्याच्या आकारमानुसार कोबीला दर मिळत आहे. 
- दिलीप चौगले, कोबी उत्पादक, हरपवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा वापर अत्यल्प करण्यास सुरुवात केली आहे. कांद्याऐवजी कोबी हा पर्याय निवडल्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत कोबीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा कोबी उत्पादकांना होत आहे. गेल्या महिन्याभरात कोबीच्या दरात नियमित दरापेक्षा दीडपटीने वाढ झाली आहे. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत नेहमीच कमी दराचा सामना करावा लागणाऱ्या कोबी उत्पादकांना यंदा दिलासादायी दर मिळत आहे. 

उपहारगृहांमध्ये वाढला कोबीचा वापर
गेल्या एक महिन्यापासून कांदयाच्या दराने उसळी घेतली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या व्यावसायिक वापरावर झाला. अगदी तीस ते चाळीस रुपये किलोने निकृष्ट दर्जाचा कांदाही मिळणे अशक्‍य झाल्याने अनेक व्यावसायिकांनी अगदी मोजक्‍या प्रमाणात कांद्याचा वापर सुरू केला. भजी व अन्य तत्सम खाद्यपदार्थांची दुकाने, शाकाहारी, मांसाहारी खाणावळींमध्ये ग्राहकांकडून कांद्यास मोठी मागणी असते.

परंतु गेल्या पंधरा दिवसांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. यापूर्वीही कांदा दरवाढ झाली, पण ती जास्त दिवस टिकत नव्हती. यंदा मात्र सलग दर वाढत राहिल्याने अखेर व्यावसायिकांनी कांद्याला पर्याय शोधण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला निम्मा कांदा व निम्म्या प्रमाणात कोबी असे प्रमाण व्यावसायिकांनी ठेवले. कांद्याच्या दराने शंभरी पार केल्यानंतर मात्र छोट्या गाड्यांवरून तर कांदा हद्दपारच झाला. त्याऐवजी पूर्णपणे कोबी पानांचा वापर करण्या‌त येऊ लागला. 

नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून कोबी दरात वाढ 
नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात कोबीला चांगले दर मिळाले. या काळात कोबीचा दर १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलोपर्यंत वधारला. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत वर्षाच्या दराचा विचार केल्यास कोबीला उच्चांकी दर फारसे मिळत नाहीत. पण कांद्याच्या दर वाढीने मात्र कोबीचे दरही वाढले. अद्यापही कोबीला नियमित मागणीपेक्षा जास्त मागणी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. येथून पुढे किमान पंधरा दिवस तरी कोबीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होण्याची शक्‍यता असल्याने अपवाद वगळता दर चांगले राहतील असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला.

कोबी दरातील वाढ दिलासा देणारी आहे. महापूर, अतिवृष्टीच्या संकटानंतर अनेकांनी कोबी पीक घेतले. काही वर्षांत पहिल्यांदाच त्यांना सुरुवातीपासून अपेक्षित दर मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे, असे दानोळी येथील महालक्ष्मी फ्लॉवर भाजीपाला संघाचे पदाधिकारी उदय आलमाने यांनी सांगितले.

 

कोल्हापूर बाजार समितीतील कोबीची आवक (पोती), दर (रुपये, दहा किलो) स्थिती
तारीख आवक दर 
२ नोव्हेंबर १०७९ ५० ते १५०
९ नोव्हेंबर २९९ १०० ते १८०
१५ नोव्हेंबर ३०४ ९० ते २००
२७ नोव्हेंबर ३४८ १५० ते २६०
१० डिसेंबर १४९   १०० ते १५०

 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...