farmer agricultural news cabbage price increase kolhapur maharashtra | Agrowon

कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’

राजकुमार चौगुले
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मी अल्पभूधारक शेतकरी आहे. काही गुंठ्यांत मी कोबीचे उत्पादन घेतो. गेल्या महिन्यात १५ ते २० रुपये एक गड्डा या दराने मी कोबी विकत होतो. पण मागणीत मोठी वाढ झाली. यामुळे बाजारातील दरही वाढले. सध्या २५ ते ३० रुपयांच्या आसपास गड्ड्याच्या आकारमानुसार कोबीला दर मिळत आहे. 
- दिलीप चौगले, कोबी उत्पादक, हरपवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा वापर अत्यल्प करण्यास सुरुवात केली आहे. कांद्याऐवजी कोबी हा पर्याय निवडल्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत कोबीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा कोबी उत्पादकांना होत आहे. गेल्या महिन्याभरात कोबीच्या दरात नियमित दरापेक्षा दीडपटीने वाढ झाली आहे. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत नेहमीच कमी दराचा सामना करावा लागणाऱ्या कोबी उत्पादकांना यंदा दिलासादायी दर मिळत आहे. 

उपहारगृहांमध्ये वाढला कोबीचा वापर
गेल्या एक महिन्यापासून कांदयाच्या दराने उसळी घेतली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या व्यावसायिक वापरावर झाला. अगदी तीस ते चाळीस रुपये किलोने निकृष्ट दर्जाचा कांदाही मिळणे अशक्‍य झाल्याने अनेक व्यावसायिकांनी अगदी मोजक्‍या प्रमाणात कांद्याचा वापर सुरू केला. भजी व अन्य तत्सम खाद्यपदार्थांची दुकाने, शाकाहारी, मांसाहारी खाणावळींमध्ये ग्राहकांकडून कांद्यास मोठी मागणी असते.

परंतु गेल्या पंधरा दिवसांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. यापूर्वीही कांदा दरवाढ झाली, पण ती जास्त दिवस टिकत नव्हती. यंदा मात्र सलग दर वाढत राहिल्याने अखेर व्यावसायिकांनी कांद्याला पर्याय शोधण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला निम्मा कांदा व निम्म्या प्रमाणात कोबी असे प्रमाण व्यावसायिकांनी ठेवले. कांद्याच्या दराने शंभरी पार केल्यानंतर मात्र छोट्या गाड्यांवरून तर कांदा हद्दपारच झाला. त्याऐवजी पूर्णपणे कोबी पानांचा वापर करण्या‌त येऊ लागला. 

नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून कोबी दरात वाढ 
नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात कोबीला चांगले दर मिळाले. या काळात कोबीचा दर १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलोपर्यंत वधारला. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत वर्षाच्या दराचा विचार केल्यास कोबीला उच्चांकी दर फारसे मिळत नाहीत. पण कांद्याच्या दर वाढीने मात्र कोबीचे दरही वाढले. अद्यापही कोबीला नियमित मागणीपेक्षा जास्त मागणी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. येथून पुढे किमान पंधरा दिवस तरी कोबीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होण्याची शक्‍यता असल्याने अपवाद वगळता दर चांगले राहतील असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला.

कोबी दरातील वाढ दिलासा देणारी आहे. महापूर, अतिवृष्टीच्या संकटानंतर अनेकांनी कोबी पीक घेतले. काही वर्षांत पहिल्यांदाच त्यांना सुरुवातीपासून अपेक्षित दर मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे, असे दानोळी येथील महालक्ष्मी फ्लॉवर भाजीपाला संघाचे पदाधिकारी उदय आलमाने यांनी सांगितले.

 

कोल्हापूर बाजार समितीतील कोबीची आवक (पोती), दर (रुपये, दहा किलो) स्थिती
तारीख आवक दर 
२ नोव्हेंबर १०७९ ५० ते १५०
९ नोव्हेंबर २९९ १०० ते १८०
१५ नोव्हेंबर ३०४ ९० ते २००
२७ नोव्हेंबर ३४८ १५० ते २६०
१० डिसेंबर १४९   १०० ते १५०

 


इतर बाजारभाव बातम्या
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...