Farmer Agricultural News campaign start to find out sari patient Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ‘सारी’चे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरु

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

नगर  ः श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणाऱ्या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करून ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करून आजाराची लक्षणे असणाऱ्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करण्यात आली असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

नगर  ः श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणाऱ्या (सारी) रुग्णांची ते रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता विविध पथके स्थापन करून ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करून आजाराची लक्षणे असणाऱ्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करण्यात आली असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावा बरोबरच जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळून येत असल्याने या रुग्णांना शोधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या दवाखान्यात आलेल्या अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठविण्याबाबत आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र, या आजाराची लक्षणे असणारे रुग्ण रुग्णालयापर्यंत येईस्तोवर ते इतरांना प्रादुर्भाव करू शकतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आता अशा रुग्णांची शोध मोहीम सुरु केली आहे.

संगमनेर मध्ये एकूण २२० पथके तयार केली गेली आहेत. त्यात सर्वेक्षणासाठी नगरपालिका क्षेत्रात २० आणि ग्रामीण भागात २०० पथके राहणार आहेत. ही पथके दररोज प्रत्येकी सुमारे ५० घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करत आहेत. दररोज सुमारे ५५ ते ६० हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. या पथकांवर निरीक्षणासाठीही वेगळे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. सारीची लक्षणे असणाऱ्या अशा रुग्णांवर उपचारासाठी संगमनेरमध्ये खास क्लिनिक तयार केले आहे. राहुरीमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. तालुक्यात एकूण २१७ पथके कार्यरत आहेत. नगरपालिका क्षेत्रात १७ आणि ग्रामीण भागात २०० पथकांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे.

मॅपिंगद्वारे हे पथक कुठे जाते आणि किती घरांना भेटी देते हे ऑनलाइन पद्धतीने पाहिले जात आहे. राहुरी मध्येही दररोज सुमारे ५० हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. श्रीरामपूरमध्ये नगरपालिका क्षेत्रासाठी एक पथक तर ग्रामीण भागासाठी १७७ पथके कार्यरत आहेत. कर्जत ब्लॉकमध्ये ग्रामीण भागातील १९६ सर्वेक्षण पथके आणि शहरी भागात १९ पथके सारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी २६ पर्यवेक्षकांमार्फत पर्यवेक्षण केले जात आहे. पाथर्डी तालुक्यात ग्रामीण भागात १७५ आणि शहरी भागात १० पथके सारी आजाराबाबत सर्वेक्षण करीत आहेत, असे श्री. व्दिवेदी यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...