धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी (ता. २०) दुपारी अडीच वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय (नगर) येथे होणार आहे. अधिकारी व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या आवर्तनासंदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी व उन्हाळी हंगामातील आवर्तनांचे नियोजन केले जाणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, धरणांच्या लाभक्षेत्रातील सर्व आमदार, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता, मुळा व भंडारदराचे कार्यकारी अभियंता कालवा सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

रब्बी हंगामात दोन आवर्तनांचे नियोजन असते. पहिले आवर्तन १० ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होत असते. परंतु, यंदा २० डिसेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. पाऊस लांबल्याने रब्बीच्या पहिल्या आवर्तनाची गरज भासली नाही. त्यामुळे या आवर्तनाचे पाणी शिल्लक राहिले आहे. त्याचा वापर उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी होणार आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामात एकऐवजी दोन आवर्तने होणार आहेत. रब्बी हंगामात आता एकच आवर्तन होईल. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर रब्बीचे आवर्तन सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com