‘निर्यातबंदी उठवायला सांगा, मला पण विकास करायचा आहे’ 

व्यंगचित्रातून मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा
व्यंगचित्रातून मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा

नाशिक : ‘माननीय खासदार साहेब व आमदार साहेब दोघांना विनंती आहे, की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगून मला परदेश दौरा करू द्या, निर्यातबंदी उठवायला सांगा, मला पण विकास करायचा आहे, या शेतकऱ्यांनी मला कष्टाने वाढवलंय, माझ्याकडून खूपच अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या’... या आशयाचा उल्लेख करीत सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथील कांदा उत्पादक शेतकरी किरण दादाजी मोरे यांनी आपल्या कुंचल्यातून कांद्याची व्यथा मांडली आहे. याद्वारे अप्रत्यक्षपणे कलेच्या सादरीकरणातून निर्यातबंदी हटविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली आहे.  केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याची निर्यातबंदी हटविण्याबाबत दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे कांदा उत्पादक पट्ट्यातील सटाण्याचे आमदार व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी काहीच भूमिका घेतलेली दिसत नाही, याच अर्थाने कांदा प्रश्‍नी रस्त्यावर न उतरता लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी व्यंग्यचित्र साकारल्याचे किरण यांनी सांगितले. 

कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी हैराण आहे, तर अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करित आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीलीप बोरसे यांनी केंद्रातील स्वपक्षाच्या सरकारकडे करावी असा आशय यात आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत केंद्राने निर्यातबंदी करून याप्रश्‍नी आडकाठी घातल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. प्रश्‍नावर वाचा फोडण्यासाठी अनेकजण आंदोलने, मोर्चे व निवेदने देत आहेत. मात्र ‘आमच्या कांद्याला परदेशवारी करू द्या, अशा आशयाचे व्यंग्यचित्र तयार करून आपली भावना लोकप्रतिनिधींकडे अप्रत्यक्षपणे पोचवली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com