... तर आम्ही मोठे आंदोलन करू ः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे ः शेतीप्रश्नी जरसरकारला जाग आली नाही, तर आम्ही मोठं आंदोलन करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
दूध दरप्रश्‍नी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.१) नायगाव (ता.मावळ) येथील जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रावर आंदोलन केले.
दूध दरप्रश्‍नी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.१) नायगाव (ता.मावळ) येथील जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रावर आंदोलन केले.

पुणे  ः राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. उद्धव ठाकरे यांना शेतीमधलं समजत नसलं तरी अजित पवार यांना समजते. त्यांनी तरी शेती प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. शनिवारी गावोगावी दूध दरप्रश्नी आंदोलन झाले आहे. आमचे आंदोलन हिंसक नसेल असं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं. जर, सरकारला जाग आली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. अजित दादा, तुम्हाला शेतीतलं सगळं समजतं मग तुम्ही गप्प का, असा सवालही श्री. पाटील यांनी यावेळी केला. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे गायीचे दूध दर घटले. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने गायीच्या  दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान, प्रतिलिटर ३० रुपये दर आणि दूध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीकरिता भाजपसह घटकपक्षांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात नायगाव (ता.मावळ) येथे शनिवारी (ता.१) आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा प्रभारी योगेश गोगावले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com