Farmer Agricultural News chief minister appeal to volunteers for registration Mumbai Maharashtra | Agrowon

आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

मुंबई  :  कोरोना विरोधातील युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले, परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता   covidyoddha@gmail.com   या ई-मेलवर नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई  :  कोरोना विरोधातील युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले, परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता   covidyoddha@gmail.com   या ई-मेलवर नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

समाज माध्यमाद्वारे बुधवारी (ता.८) जनतेशी साधलेल्या थेट संवादादरम्यान श्री. ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, की सर्दी, पडसे आणि तापाचे लक्षणे असलेल्या रुग्णांची  तपासणी करून त्यांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे पुढील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सौम्य लक्षणे, तीव्र लक्षणे आणि इतर तक्रारी, गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

तीव्र लक्षणे, गंभीर आजार व इतर तक्रारी असणाऱ्या रुग्णांना तिसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात  येत असून ही रुग्णालये  ह्रदयविकार, किडनी, मधुमेह यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज आहेत. ‘कोरोना’च्या संकटानंतर एक नवीन आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्याचा सामना करण्यासाठी तंदुरुस्ती आणि हिमतीची आवश्यकता आपल्या सगळ्यांना भासेल. त्यामुळे घरातच हलका व्यायाम करावा, असे त्यांनी सांगितले.
 
‘रुग्णवाढीचा आलेख शून्यावर आणायचा आहे’
श्री. ठाकरे म्हणाले, की आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण सापडून ४ आठवडे पूर्ण झाले. लॉकडाउनने गैरसोय होतेय हे खरे आहे. पण सोशल डिस्टन्सिंगसारखे दुसरे हत्यार आज आपल्याकडे नाही.  एवढे करूनही संख्या वाढते आहे. परंतु आपल्याला ही वाढच नको आहे. रुग्णांचा वाढता आलेख आपल्याला शून्यावर आणायचा आहे. त्यामुळे आपणच आपले संरक्षक आहोत, हे लक्षात ठेऊन प्रत्येकाने वागायचे आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची संख्या, चाचण्यांची संख्या याची माहिती देताना बरे होऊन घरी परतलेल्या ८० व्यक्ती आहेत, हे देखील आवर्जून सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...