नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा उतारा

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा मोहिमेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या आठ दिवसांत मोहीम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सरकारचे निर्देश येताच नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचा उतारा उपलब्ध होणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या प्रणालीत नगर जिल्हा नाशिक विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १२ लाख ५७ हजार ६७५ (९९ टक्के) सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. केवळ एकच टक्का काम बाकी आहे. ही कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडूनही याबाबत लवकरच ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, असे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. येत्या मार्चपासून नागरिकांना सुलभरीत्या सात-बारा मिळेल. नागरिकांचा वेळ व पैशांची बचत यामुळे होणार आहे. 

स्थावर मालमत्तेच्या माहितीसाठी सात-बारा उतारा आवश्‍यक असतो. मात्र, त्यासाठी तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागतात. त्यात नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो. ही स्थिती लक्षात घेऊन, २००२ मध्ये सरकारने सात-बारा उताऱ्याच्या संगणकीकरणाची मोहीम हाती घेतली. या मोहिमेला खऱ्या अर्थाने २०१७ मध्ये गती आली. जिल्ह्यात एकूण १६०२ गावे आहेत. जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यांची संख्या १२ लाख ७३ हजार ५८९ आहे. आजअखेर १२ लाख ५७ हजार ६७५ सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत, म्हणजेच ९९ टक्के काम पूर्ण झाले. राहुरी तालुक्‍याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. 

तालुकानिहाय डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा उतारे : नगर- १,५७,६२२, अकोले- १,३१,८७०, राहुरी- ८६,७८१, पारनेर- १,१२,५२६, श्रीगोंदे- ६२,२२४,कर्जत- ९३,१६६, जामखेड- ४९,४१४, संगमनेर- १,६८,८५४, कोपरगाव- ६३,९८९, राहाता- ५२,३२८, श्रीरामपूर- ४१,२०९, नेवासे- ७७,६६५, शेवगाव- ६८,६५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com