पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. विविध भाजीपाल्याची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती.
पुणे बाजारसमितीत झालेली टोमॅटो, बोरांची आवक
पुणे बाजारसमितीत झालेली टोमॅटो, बोरांची आवक

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. विविध भाजीपाल्याची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती.  

कर्नाटक येथून कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. एकूण आवकेच्या ६० टक्के आवक ही कर्नाटकातून होती. दर वाढलेल्या भाजीपाल्यामध्ये भेंडी, गवार, गाजर, हिरवी मिरची, काकडी, दोडका यांच्यासह पालेभाज्यांचा समावेश होता.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ७ टेम्पो गाजराची, कर्नाटक, गुजरात येथून ३ टेम्पो कोबीची, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरचीची, तामिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ३ टेम्पो, तर आग्रा आणि इंदौर येथून ४० ट्रक बटाटा, गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसणाची १२ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे ६०० गोणी, कोबीची सुमारे ४ टेम्पो, फ्लॉवरची १० टेम्पो, भेंडी आणि गवारीची प्रत्येकी सुमारे ५, सिमला मिरचीची १० टेम्पो, हिरवी मिरचीची ३ टेम्पो, टोमॅटोची ६ हजार क्रेट आवक झाली होती. भुईमुगाची सुमारे १०० गोणी, पारनेर, पुरंदर येथून मटारची अवघी सुमारे ३० गोणी, तांबडा भोपळ्याची ८ टेम्पो, कांद्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे दीड लाख तर मेथीच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति १० किलो) ः कांदा - २५०-३८०, बटाटा -२५०-३२०, लसूण - ६००-१२००, आले सातारी २००-३००, भेंडी ३००-४००, गवार - गावरान, सुरती - ५००-६००, टोमॅटो -१५०-२५०, दोडका ३००-५००, हिरवी मिरची - ३००-४००, दुधी भोपळा - २५०-३५०, चवळी - २५०-३००, काकडी -२००-२५०, कारली हिरवी - ३००-४००, पांढरी -२५०-३००, पापडी - ३५०-४००, पडवळ -२००-२५०, फ्लॉवर १५०-२५०, कोबी -१२०-१६०, वांगी -३००-४००, डिंगरी - २००-२५०, नवलकोल - १००-१२०, ढोबळी मिरची - २५०-३२०, तोंडली- कळी ४५०-५००, जाड -१८०-२००, शेवगा -५००-७००, गाजर - २००-२५०, वालवर - ३००-४००, बीट १४०-१५०, घेवडा -६००-७००, कोहळा १००-१५०, आर्वी -२००-२५०, घोसावळे २००-२५०, मटार स्थानिक - १४००- १६००, पावटा ३००-४००, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -२००-२२०, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१२०.   पालेभाज्यांचे दर (शेकडा) ः कोथिंबीर १५००-३५००, मेथी १०००-१६००, शेपू ८००-१२०० कांदापात ८००-१२००, चाकवत ८००-१२००, करडई -८००-१०००, पुदिना - ४००-६००, अंबाडी -८००-१०००, मुळे १४००-१५००, राजगिरा - ५००-८००, चुका ५००-६००, चवळई -७००-८००, पालक १०००-१५००.   फुलबाजार फुलांचे दर (प्रतिकिलो) ः झेंडू : १०-२०, गुलछडी : १०-३०, बिजली -२०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : २०-६० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिली बंडल : ६-६ जरबेरा : १०-२०, कार्नेशन २०-४०.   फळांचा बाजार रविवारी (ता.२७) येथील फळ बाजारात संत्रीची १५ टन, मोसंबीची सुमारे ७० टन, डाळिंबाची सुमारे ५० टन, पपईची २५ टेम्पो, लिंबाची ३ हजार गोणी, कलिंगडाची ५ टेम्पो, खरबुजाची ४ टेम्पो, सीताफळाची १० टन, चिकूची एक हजार तर पेरू सुमारे ५०० क्रेट्स आवक झाली.

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : १५०-३००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन ) : ४०-११०, संत्रा : (१० किलो ) : १००-६५० डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : ५-३० आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-२०, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सीताफळ - १०-१२०. पेरू (२० किलो क्रेट) - ३००-४५०.   बोरांचा हंगाम सुरू पुणे बाजार समितीमध्ये बोरांचा हंगाम सुरू झाला असून, गेल्या आठवड्यापासून सोलापूर, नगर भागातून विविध बोरांच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. रविवारी (ता.२७) विविध जातींच्या बोरांची सुमारे ५० गोणी आवक झाली होती. विविध बोरांचे दहा किलोचे दर ः चमेली १२०-१५०, उमराण ५०-७०, चेकनट ६००-७००.   मटण मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ४०० किलो तर नदीच्या मासळीची एक टन आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मासळी, मटणाचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मागणी वाढल्याने चिकनच्या दरात १० रुपये वाढ झाली होती.

खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १०००-१४००, मोठे १४००, मध्यम : ७००-९००, लहान ४४०- ५५०, भिला : ३६०-४००, हलवा : ४००-४४०, सुरमई : ४००, रावस : लहान ४८०, मोठा : ७५०, घोळ : ६००, भिंग : ३६०, करली : २८०-३२०, करंदी : सोललेली ४००, पाला : १२००-१४००, वाम : ४८०-५५०, ओले बोंबिल : १४०-१६०.

कोळंबी ः लहान २८०, मोठे ३६०- ४८०, जंबोप्रॉन्स : १०००-१२००, किंगप्रॉन्स : ६५०, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २८०, मांदेली :१४०- १६०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४००-४८०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २४०, नगली : लहान ३६० मोठी ६००, तांबोशी : ४००, पालू : २००, लेपा : १६०, शेवटे : २००, बांगडा : लहान २४० , मोठे २८०-३२०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २८०, खुबे : १६०, तारली : १६०. नदीची मासळी : रहू : १६०, कतला : २००, मरळ : ४८० शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १२०, खेकडे : २२०-२४० वाम : ५५०-६००.

चिकन : चिकन : १९०, लेगपीस : २३०, जिवंत कोंबडी : १५०, बोनलेस : २९०. अंडी : गावरान : शेकडा : ७३०, डझन : ९६, प्रति नग : ८, इंग्लिश : शेकडा : ५४५, डझन : ७२, प्रतिनग : ६.

मटण : बोकडाचे : ६४० बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com