सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने उपलब्ध करून देण्याबाबत ठराव संमत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने उपलब्ध करून द्यावी, यासह विविध विषयांवरील ठराव वाशीम येथे नुकत्याच झालेल्या सीताफळ महासंघाच्या (पुणे) १६व्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळा व संस्थेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आले. या वेळी महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी यांनी ठराव मांडले. या परिषदेला राज्यभरातील उत्पादक, लोकप्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ उपस्थित होते.

असे आहेत प्रमुख ठराव

  • शासनाकडून योग्य नियोजनासाठी सीताफळ लागवडीची संपूर्ण तपशीलवार माहिती उपलब्ध करून द्यावी.  
  • मंत्रालयात जानेवारी २०१७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात सीताफळासाठी पायलट योजनेबाबत व जुलै २०१९ मध्ये मेहकर (बुलडाणा) व खेड (अमरावती) येथे सीताफळ हबबाबत झालेल्या निर्णयाची लवकर पूर्तता करण्यात यावी. 
  • सीताफळ प्रक्रिया उद्योग विकासासाठी सर्वंकष योजना तयार करून कार्यान्वित करावी. 
  • वाशीम जिल्ह्यात ५०० हेक्टर समूह क्षेत्रावर सीताफळ लागवड करण्यात यावी. 
  • सीताफळ संशोधन केंद्र जाधववाडी, अंबेजोगाई व अमरावती येथे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींवर संशोधन करण्यासाठी सीताफळ महासंघाचा सहभाग वाढवावा. 
  • राज्यात सीताफळ विकासासाठी सीताफळ महासंघ (पुणे) या पंजीकृत सेवाभावी संस्थेस नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com