संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ
पुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू लागल्याने खासगी आणि सहकारी दूध संघांकडून गायीच्या दूधविक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची; तर खरेदी दरात १ रुपयांची वाढ सोमवारपासून (ता.१६) करण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

पुणे येथे शनिवारी (ता.१४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कल्याणकारी संघाची शनिवारी कात्रज दूध संघात बैठक झाली. या वेळी ६० संघांचे १५० प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी कुतवळ म्हणाले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडले तर मोठ्या प्रमाणावर पशुधन आजारी पडल्याने ३० टक्के दूध संकलन कमी झाले आहे’’. तसेच परराज्यातून खरेदी वाढत असल्याने दुधाची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच प्रति लिटर ५ रुपये दूध खरेदी अनुदानासाठी पुढील आठवड्यात कल्याणकारी संघाचे शिष्टमंडळ दुग्धविकास मंत्र्यांना भेटणार आहे, असे सांगितले.
- 1 of 1029
- ››