कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा

कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील केवळ २२२२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील केवळ २२२२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.   

जिल्ह्यात सहा लाख ३० हजार खातेदार आहेत. यातील ऊस उत्पादक वगळल्यास इतर खरीप पिके घेणारे खातेदार साडेचार लाख आहेत. ऊस वगळता निव्वळ खरिपाचे क्षेत्र अडीच लाख हेक्टर आहे. जिल्ह्यातील भुईमूग, नाचणी, भात, ज्वारी आणि सोयाबीन या पाच पिकांना विमा लागू आहे. परंतु, अपवाद वगळता या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदाही पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. केवळ नाममात्र म्हणजे एकूण खातेदारांच्या अर्धा टक्के शेतकऱ्यांनीच पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जादा संख्येने शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. हीच या योजनेबाबतची समाधानाची बाब म्हणावी लागेल. गेल्यावर्षी ६८२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. यापैकी केवळ १५० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती. राज्यातील समृद्ध जिल्हा असणाऱ्या कोल्हापुरात पीक विमा योजनेत मात्र सर्वांत कमी शेतकरी सहभाग घेत असल्याचे चित्र आहे. खरीप पेरणीच्या टक्केवारीत जवळपास निम्मे क्षेत्र हे उसाचे असते. उसाचा समावेश या योजनेत नसल्याने उत्पादकांना याचा लाभ होत नाही. 

जिल्ह्यातील काही तालुके वगळता बहुतांशी ठिकाणी पावसाळ्यात चांगला पाऊस होतो. ज्या पिकांना विम्याचा लाभ मिळतो अशा पिकांचे क्षेत्र हे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात आहे. दरवर्षी या भागात चांगला पाऊस पडतो, पिकाची उत्पादकता निकषांनुसार घटत नसल्याने याचा लाभ उत्पादकांना मिळत नाही. जरी मिळाला तरी तो नाममात्र मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसते.

प्रतिक्रिया नुकसानभरपाई मिळण्यासाठी पीक विम्याच्या निकषांपेक्षा जिल्ह्याची पीक उत्पादकता जास्त असल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ कमी मिळतो. यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमा योजनेत जादा संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,कोल्हापूर.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com