नगरमधील एक लाखांवर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याचा अंदाज

नगर ः ‘कोरोना’मुळे लाॅकडाउन करण्यात आले. याशिवाय पीकविमा भरण्याचे सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्यामुळे नगर जिल्ह्यात यंदा साधारण एक लाखांहून अधिक शेतकरी विमा योजनेत सहभागापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः ‘कोरोना’मुळे लाॅकडाउन करण्यात आले. याशिवाय पीकविमा भरण्याचे सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्यामुळे नगर जिल्ह्यात यंदा साधारण एक लाखांहून अधिक शेतकरी विमा योजनेत सहभागापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के कमी शेतकऱ्यांनी विमा भरला आहे.  

नैसर्गिक बाबींमुळे पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते. दरवर्षी अनेक शेतकरी पीकविमा भरतात. मात्र पिकांचे नुकसान होऊनही विम्यातून मदत मिळत नसल्याने यंदा या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातही पीक विमा भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सातत्याने सामोरे जावे लागले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार साधारण अडीच ते पावणे तीन लाख शेतकरी या योजनेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

या योजनेत सहभागासाठी शुक्रवारी (ता.३१) शेवटची मुदत होती. त्यामुळे विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. मात्र सर्व्हर सतत बंद पडत असल्यानेही विमा भरण्याला अडचणी येत होत्या. गेल्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये साधारण पाच लाख शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. त्या तुलनेत यंदा ५० टक्केच शेतकरी आत्तापर्यंत सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.

विमा भरण्यात सातत्याने येणाऱ्या अडचणी पाहता योजनेला साधारण पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे किमान एक लाखाहून अधिक शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता होत आहे. 

प्रतिक्रिया ‘कोरोना’मुळे अनेक भागांत गेल्या पंधरा दिवसांच्या काळात लॉकडाउन होते. याशिवाय पंतप्रधान पीकविमा योजनेतून अर्ज भरण्यासाठी असलेले सर्व्हर सातत्याने बंद पडत होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे योजनेस किमान पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. - संभाजी दहातोंडे पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com